बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नरेंद्र मोदी अपयशी आणि हतबल”

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 18 वर्षावरील लसीकरण चालू केलं तर लसींचे डोस अपुरे पडत आहेत. राज्यातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये बोटावर मोजण्याइतकेच लसीकरण केंद्र चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी चार लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झाल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्रसरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र केंद्रसरकार यामध्ये हतबल झाल्याचं दिसून येत आहे, असंही मलिक म्हणाले.

मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे आणि वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून केंद्र सरकार अन्याय करत आहे की?, केंद्रसरकारला काम करता येत नाही?, असा टोला मलिकांनी लगावला आहे.

दरम्यान, लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-.

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय- नरेंद्र मोदी

हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल, महिला वेटरनं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

…तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल- चंद्रकांत पाटील

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही- राहुल गांधी

शिवसेनेच्या माजी आमदाराचं बंड; पंढरपूरनंतर आता देगलूरही महाविकास आघाडीच्या हातातून जाणा का?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More