बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या”

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोना लसीच्या अपुऱ्या डोसमुळे लसीकरणाची मोहिम मंद गतीने चालू आहे. अशातच ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष चालू असलेला पाहायला मिळत आहे.

केंद्राने ट्विटरला नोटीस पाठवल्यानंतर शनिवारी संघचालक मोहन भागवत, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची ट्विटरने ब्लू टीक हटवण्यात आली होती. काही वेळानंतर पुन्हा ब्लू टीक देण्यात आली. यावरून अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहेब्लू टीक आणि लसीकरण यातील फरक केंद्राने समजून घ्यावा. त्यासोबतच त्यांनी लसीकरणापेक्षा लसीकरणावर भर द्यावा, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दरम्यान, ट्विटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचं मलिक म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी ई-पास हवाय!’

पुण्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ‘या’ हॉटेलवर पोलिसांची धाड; तब्बल 41 जणांवर गुन्हा दाखल

धक्कादायक! व्हिडीओ बनवण्याच्या नादात स्वतःलाच पेटवून घेतलं

‘नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत गेल्यावर तरी खरं बोलावं’; चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला

“अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More