बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुजरातमधील दंगल चुकीची होती हे नरेंद्र मोदींनी मान्य करावं”

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी यावरून राहुल गांधींना टोला लगावला आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं ते देखील चुकीचं होतं, असं राहुल गांधी म्हणाले. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.  आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता हे राहुल गांधी यांनी 45 वर्षांनंतर स्वीकारलं. आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे. गुजरातमधील दंगल चुकीची होती हे त्यांनी मान्य करावं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणं एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, आजीने आणलेली आणीबाणीही चुकीची होती हे राहुल गांधींनी आता मान्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ज्या चुकीच्या, तथ्यहीन आणि तिरस्करणीय टिप्पण्या केल्या होत्या, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्विटवर ट्रेंड होतोय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे किस्सा?

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड

सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप मंत्र्याचा राजीनामा

धक्कादायक! मंत्र्याच्या सेक्स सीडीतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More