बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पब्लिसिटीसाठीच काम करेन असं वागणं बरं नव्हं- नवाब मलिक

मुंबई | राज्यसह देशभरात कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला हाणला आहे. आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

निवडणूकांसाठी आणि भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली.

आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात सीरमला लस तयार करण्याचा परवाना देण्यात आला. लस ही गरज आहे त्यामुळे लसीचं उत्पादन वाढवणं सरकारचंही काम, सीरमचंही काम आहे. आधी सीरमने सांगितलं, 400 रुपयांत लस देणार, मग 300 केली. संभ्रम निर्माण झाला. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण केले. सीरमने तिघांना वेगळे भाव दिले. ते स्वत: यासाठी जबाबदार आहेत, असंही मलिक म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मन हेलावून टाकणारा फोटो; कोरोना मुक्त झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी

‘पराभूत झालो तरी…’; पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया

“अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती, ते आकाशात उडत होते”

भटजीला थोबाडीत मारुन लग्न थांबवणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं

निवडणुका संपल्या! आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More