मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजबिलावरून बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी केलेल्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. येत्या काळात ते भाजपबरोबर जाणार आहेत म्हणून त्यांनी पवारांवर टीका केली असल्याचं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातम्या होत नाहीत, असा टोलाही मलिकांनी लगावला आहे. त्याआधी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पवारांवर वीजबिलासंदर्भात गौप्यस्फोट केला होता.
दरम्यान, पवार म्हणाले वीज कंपन्यांच्या नावाने मला पत्र लिहू पाठवा. मग संबंधित कंपन्यांमध्ये अदानी, एसएमबी किंवा टाटा असेल त्यांच्याशी पवार बोलणार होते. मात्र नंतर 5 ते 6 दिवसांनी मला समजलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. तेव्हा त्यांच्यात काय चर्चा झाली माहित नाही मात्र नंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं असल्याचं, राज ठाकरेंनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
…तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी
“उतणार नाही मातणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही”
“देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”
भाजपला आणखी एक झटका,’या’ माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
गॅस दरवाढीची मोदींच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा- रूपाली चाकणकर
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…- राकेश टिकैत
Comments are closed.