बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही, दिशाभूल करण्यात आली”

मुंबई | केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची गरज नसून शेतकऱ्यांचा आक्षेप असलेल्या मुद्द्यांमध्ये योग्य दुरुस्ती केली जावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दिल्याचं काही माध्यमांमध्ये बोललं जात होतं. मात्र ते वक्तव्य पवारांचं नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांना महाविकास आघाडीमधील तिन्हा पक्षांचा विरोध आहे. हा विरोध कालही होता, आज आणि उद्याही कायम राहील. विधानसभेमध्ये या कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पारित करण्याचं काम सरकारकडून होणार आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी सरकारतर्फे समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करुन शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करेल. अभ्यासाअंती आपला अहवाल सरकारला देईल. या अहवालातील मसुदा शेतकऱ्यांना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही, असं मलिक म्हणाले.

दरम्यान, पवार यांनी तीन कृषी कायद्यांच्या बाबतीत केंद्र सरकारला कोणताही सल्ला दिलेला नाही. मात्र काही माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्यात आली. तीनही कृषी कायदे रद्द व्हावेत, ही पक्षाची सुरुवातीपासूनची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

“राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही”

“इथे माझा संसार थाटत नाही आणि लोकांचे घटस्फोट होत आहेत”

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रश्नांना यश येतं”

लवकरंंच राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार? शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More