मुंबई | कोरेगाव भीमा हिंसाचार तपासाबाबत महाराष्ट्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसेल तर राज्य सरकार बरखास्त होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जर हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघीडीचं सरकार बरखास्त करून दाखवावं, असं ओपन चँलेंज नवाब मलिक यांनी मुनगंटीवार यांना दिलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि शहांच्या विरोधात हे सरकार आलं आहे. सामान्य जनता मोदी शहांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नाही. कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी चालू आहे. अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर कुणीही नाराज नसल्याचंही मलिकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नवाब मलिकांच्या टीकेवर भाजप काय उत्तर देणार?, हे पाहण महत्वाच ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पडद्यावरच्या खलनायकानं जिंकली जनतेची मनं
“शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही”
महत्वाच्या बातम्या-
बँक फोडून टाकेन’; नवनीत राणांना संताप अनावर
कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा; याचिका दाखल
तो व्हिडीओ पाहून रितेश हळहळला; नेटकऱ्यांकडे मागितला व्यक्तिचा फोन नंबर!
Comments are closed.