बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानचं समुपदेश केलं मग पुरावे द्या! नवाब मलिकांचं NCB ला खुलं आव्हान

मुंबई | ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानवर सध्या एनसीबीची कारवाई सुरू आहे. या कारवाईबाबत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या राजकीय वाद सुरू आहे. एनसीबीची कारवाई सर्व बनाव असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तर एनसीबीने सगळ्या नियमाला धरून कारवाई सुरू असल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.

एनसीबीकडून आर्यन खानचं समुपदेश केलं जात असल्याची बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानचं कौन्सिलिंग कधी केलं ते सांगावं आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे. आर्यन खानचं समुपदेश करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी तुरूंगात गेले होते का?, असा सवाल देखील नवाब मलिक केला आहे.

मी तुरूंगातून सुटल्यानंतर एक चांगली व्यक्ती म्हणून बाहेर येईन. तसेच जे लोक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, त्यांना मदत करणार आहे, असं आश्वासन देखील आर्यन खानने समुपदेश करतेवेळी समीर वानखेडेे यांना दिलं आहे.

दरम्यान, एनसीबीने क्रुझवर टाकलेल्या धाडीमध्ये आर्यन खानसह 11 जण आढळून आले होते. त्यानंतर त्यांचीे एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. याप्रकरणावरून राज्यात अनेक राजकीय वाद घडून आले आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश

अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर

आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

नगरमधील एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- राधाकृष्ण विखे पाटील

“मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More