बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबी कारवाईबाबत नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई | सध्या संपुर्ण देशभरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एनसीबीने केलेल्या ड्रग्ज प्रकरणातील कारवाईची. या कारवाईमध्ये प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात असल्याने ही एक हायप्रोफाईल केस बनली आहे. या प्रकरणाचे आता राजकीय पडसादही उमटताना पाहायला मिळत आहेत.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप करत बुधवारी पत्रकार परिषदेत चांगलेच ताशेरे ओढले होते. त्यानंतर एनसीबीच्या भुमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. तसेच त्यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली होती.

आता नवाब मलिक हे शनिवारी म्हणजेच उद्या पत्रकार परिषद घेऊन एनसीबी कारवाईबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सगळ्यांचच लक्ष सध्या या घडामोडीकडे आहे.  नवाब मलिक यांनी मला एनसीबीच्या चुकीच्या कारवाईबद्दल माहिती उघड करायची आहे, असं म्हणत त्यासाठी लागणारी माहिती गोळा करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागणार असल्याने शुक्रवार ऐवजी शनिवारी पत्रकार परिषद होईल, असं घोषित केलं आहे.

शाहरूख खानच्या मुलाला केलेली अटक ही बनावट असल्याचा आरोप करत मलिकांनी एनसीबीवर चांगलंच शरसंधान साधलं होतं. त्यानंतर आता पत्रकार परिषदेत नवाब मलिक आणखी काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा पत्नीसोबतचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

अखेर ब्रिटननं भारताचं ऐकलं; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More