बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढू’, वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा आक्रमक पवित्रा

मुंबई | कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं. नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर मलिकांची मुलगी सना मलिकने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल अशी भूमिका सना मलिक यांनी घेतली आहे.

नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी ईडीने कारवाई केली यात शंका नाही, असा घणाघात सना मलिकने केला आहे. यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढू, असा इशारा सना मलिक यांनी दिला आहे.

दरम्यान, माझे वडील 30 वर्षांपासून राजकारणात आहेत. आता त्यांच्यावर थेट टेरर फंडिंगचा आरोप झाला. आम्हाला जितका दाबण्याचा प्रयत्न कराल तितके आम्ही उसळून येऊ आणि कणखरपणे लढू, असं वक्तव्य सना मलिक यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकारची अफलातून योजना, एकाच वेळी मिळणार 10 लाख

“आता जीव गेला तरी चालेल पण भाजपला सोडणार नाही”

कोण म्हणतं चाट खाऊन वजन कमी करता येत नाही?, मग हे ‘चाट’ एकदा खाच

“समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफजलखानी वार सुरू”

“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या शिवाजी पार्कात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More