बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नवाब मलिकांच्या लेकीच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण शिगेला पोहोचलं. नवाब मलिक यांच्या लेकीने केलेल्या नव्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने (Nilofer Malik) मलिकांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. भाजप (BJP) नेत्यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबध आहेत. तसेच याबद्दलची माहिती माझ्याकडे असल्याचं नवाब मलिक या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. नवाब मलिकांच्या या जुन्या व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ पाहायला मिळत आहे.

नवाब मलिक त्यांच्या या जुन्या भाषणात भाजप नेत्यांचं बिंग फोडण्याबद्दल बोलत आहेत. माझ्या जवळ असलेला हायड्रोजन बॉम्ब फोडल्यावर, माझ्याजवळ असलेली सीडी बाहेर काढल्यावर भाजप नेत्यांची अवस्था बिकट होईल, असा दावा नवाब मलिक करताना दिसत आहेत.

दरम्यान, नवाब मलिकांना हे सत्य उघड करण्यापासून रोखण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे, असा आरोप निलोफर मलिक यांनी हा व्हिडीओ शेअर करत केला आहे. तर सत्य कुठेही जात नाही आणि आम्हीही जाणार नाही, असा विश्वास देखील निलोफर मलिक यांनी व्यक्त केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत”

Netflix वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कंपनीने घेतला मोठा निर्णय

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाचा दणका

38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More