Top News महाराष्ट्र मुंबई

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर धाड टाकली. यावर नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मलिकांनी ट्विट केलं आहे.

तसंच, मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, 200 किलो ड्रग्स प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यामधील मुख्य आरोपी करण संजानी आणि समिर यांच्यात दोघांमध्ये गुगल पे वरून 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. त्यामुळं एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग खरेदी-विक्री झाल्याचा संशय असल्यामुळं एनसीबीकडून समिर खानला समनमस पाठवण्यात आलं होतं.


थोडक्यात बातम्या-

महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक

Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक

“कृषी कायद्यांना स्थगिती देऊन लक्ष्मण रेषा ओलांडली, कोर्टाला अचानक एवढी तत्परता आली कोठून?”

“माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत…”; रामदास आठवले यांनी घेतली नवी शपथ!

“बर्ड फ्लूमुळं व्यावसायिकांचं नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या