मोठी बातमी! नवाब मलिकांची प्रकृती खालावली; महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नवाब मलिक यांना अखेरीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुर्ला येथील क्रिटीकेअर हॅास्पिटलमध्ये नवाब मलिक यांना दाखल करण्यात आले आहे. मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत आहे, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे. या संदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठीने दिलं आहे.
2 मे रोजी नवाब मलिक यांना आर्थर रोड कारागृहातून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती.
दरम्यान, मलिक यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होणार असून यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हॉस्पिटल बाहेर ठेवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचा खर्च हा मात्र नवाब मलिक यांना करावा लागणार आहे, असे निर्देश कोर्टाने दिले आहे.
थोडक्यात बातम्या-
इंडियन टीमच्या ‘गब्बर’ची बॉलिवूडमध्ये एंट्री, शिखरच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार
मोठी बातमी! रूपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल
शिवसेनेनं दुसरा उमेदवार जाहीर करताच संभाजीराजेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
शिवसेनेचा संभाजीराजेंना जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘स्मृती ईराणींवर केलेला हल्ला भ्याड, आता आम्हीही…’; देवेंद्र फडणवीस संतापले
Comments are closed.