बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली. नवाब मलिकांना अटक झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

नवाब मलिकांना न्यायालयाने आणखी एक झटका देत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मलिकांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

नवाब मलिकांची तब्येत खालावत असल्याचं मलिकांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं होतं. तब्येतीचं कारण देत न्यायालयात मलिकांच्या जामिनाची मागणी करण्यात आली होती. मात्र, ईडीने मलिकांच्या मागणीला जोरदार विरोध केला. तसेच ईडीने नवाब मलिक प्रकरणात 5 हजारांपेक्षाही अधिक पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

दरम्यान, नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक झाल्यापासून ते तुरूंगातच आहेत. एकिकडे ईडीने त्यांच्या संपत्तीवर टाच आणली असून दुसरीकडे सातत्याने त्यांच्या कोठडीत वाढ होत आहे. याप्रकरणी आणखी एकदा मलिकांच्या कोठडीत वाढ झाली असून त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला”

कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर!

रवी राणांना पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

कॅच पकडताना रविंद्र जडेजाला मोठी दुखापत, पाहा व्हिडिओ

“भीमा कोरेगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More