बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंच्या मेहुणीवर गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | आर्यन खान प्रकरणापासून रंगत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे वादात आता नवा ट्विस्ट आला आहे. आर्यन खानला अटक झाल्यापासून नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोपाच्या फैरी झाडत खुलास्यांचा सपाटा लावला आहे.

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी त्यांचा मोर्चा समीर वानखेडेंची मेहुणी अर्थात क्रांती रेडकरच्या बहिणीकडे वळवला आहे. समीर वानखेडेंच्या वडीलांनी मलिकांच्या विरोधात 1.25 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पण नवाब मलिकांचं आरोपसत्र अजुनही सुरूच आहे.

समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का?, असा सवाल नवाब मलिकांनी ट्विट करत विचारला आहे. समीर वानखेडेंच्या मेहुणीवर गंभीर आरोप करताना नवाब मलिकांनी पुरावे देखील सादर केले आहेत. तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्याने तुम्ही उत्तर द्या, अशी मागणीही नवाब मलिकांनी केली आहे.

समीर वानखेडे हिंदु नसून मुस्लिम आहेत, त्यांच्या वडीलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे आहे, अशा खळबजनक आरोपांसह नवाब मलिकांनी त्यांच्या विरोधात अनेक खुलासेही केले. त्यानंतर आता समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा ड्रग्ज व्यवसायात असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेवरून संजय राऊत सरकारवर भडकले, म्हणतात….

जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले नरेंद्र मोदी; जो बायडन यांनाही मागे टाकलं

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

मी भाजप नेत्यांपुढे हात जोडतो पण तुम्ही….- नवाब मलिक

मोठी बातमी! अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More