बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो’ दाढीवाला ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र? पत्रकार परिषदेत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

मुंबई | नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे वाद आता शिगेला पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो शेअर केल्यावर साधारण तासाभरातच नवाब मलिक यांनी खळबळजनक पत्रकार परिषद घेतली. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधत घणाघाती आरोप केले आहेत. क्रुझवर कारवाई करण्यापूर्वी एनसीबीने महाराष्ट्र पोलिसांकडून परवानगी घेतली नसल्याचा खुलासाही मलिकांनी केला आहे.

तर कारवाई झालेल्या कॉर्डेलिया क्रुझवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता आणि हा माफिया तोच समीर वानखेेडेंचा दाढीवाला मित्र असल्याचा धक्कादायक दावाही मलिकांनी केला आहे. समीर वानखेडेंनी त्या मित्राचं नाव जाहीर करावं नाहीतर मी करेन, असा इशाराही नवाब मलिकांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले की, क्रुझवरील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा सगळं सत्य समोर येईल.

त्या क्रुझ पार्टीत दाढीवाल्या व्यक्तीची प्रेमिकाही बंदुक घेऊन हजर होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज चेक करावं, अशी मागणी मलिकांनी केली आहे. क्रूझवर रेड झालीच नाही, त्या अगोदरच सगळी कारवाई झाली आणि हे लवकरच सगळ्यांसमोर उघड होणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. तर तीन जणांचे सीडीआर तपासा सगळा कार्यक्रम जगजाहीर होईल, असा खळबळजनक दावाही मलिकांनी केला आहे.

समीर वानखेडे, पंच प्रभाकर साईल आणि वानखेडेंचे चालक यांचा सीडीआर तपासण्याची मागणी नवाब मलिकांनी एनसीबीकडे केली आहे. हे सगळे आरोप खुप गंभीर आहेत. एनसीबीने तात्काळ पावलं उचलावीत. या तिघांचा सीडीआर तपासला तर सगळाच घटनाक्रम समोर येईल, असंही नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. यापुर्वीही मलिकांनी वानखेडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांच्या मासिक वेतनाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

शेतकऱ्यांनो आता सातबारा काढा घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये; कसं ते वाचा सविस्तर

समीर वानखेडेंचा आणखी एक जुना फोटो शेअर करत मलिक म्हणतात, मला तर…

“आर्यन खानला फसवण्यात आलं असून, समीर वानखेडेंची नोकरी जाणार”

समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्यात येत असल्याच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More