बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साथियो, सुना है मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है”, मलिकांच्या ट्विटने खळबळ

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) चांगलेच चर्चेत आले. कधी ट्विट करत तर कधी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी अनेक खुलासे केले. नवाब मलिक यांनी केलेल्या नव्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, असं म्हणत नवाब मलिकांनी त्यांच्या घरी ईडीचा (ED) छापा पडणार असल्याचा दावा केला आहे. नवाब मलिक यांनी या दाव्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Nawab Malik) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

‘मी ऐकलं आहे की आज उद्यामध्ये माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू’, असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे. घाबरणं म्हणजे रोज मरणं. आपल्याला घाबरायचं नाही, लढायचं आहे, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘गांधी लढे थे गोरों से, हम लढेंगे चोरों से’, असं म्हणत नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. नवाब मलिकांच्या ट्विटनंतर त्यांचा दावा खरा ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“…तर भाजप आम्हाला लांब नाही”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं; पत्नीनं भररस्त्यात दोघांना…

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More