बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?’; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने खळबळ

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापसून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात खुलास्यांचा सपाटा लावला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत आणि पत्रकार परिषदा घेत समीर वानखेडेंवर आत्तापर्यंत आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या आहेत. तर नवाब मलिक यांनी आज सकाळी स्फोटक पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंविरोधात खळबळजनक खुलासे केले आहेत.

समीर वानखेडे यांचा मुंबईत एक बार असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर वयाची 18 वर्षे पूर्ण करण्याच्या आतच समीर वानखेडे यांच्या नावावर परमिट रूमचा परवाना वानखेडेंच्या नावावर घेण्यात आला असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नोकरी सुरू असताना शासकीय अधिकारी व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे वानखेडेंवर कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

समीर वानखेडेंच्या नावावर असलेल्या रेस्टो बारचं नाव सद्गुरू आहे. तर या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तर नवाब मलिकांनी या बारचा फोटो ट्विट करत सोबत समीर दाऊद वानखेडे यांचं आणखी एक फर्जीवाडा केंद्र असं लिहिलं आहे. तर समीर वानखेडेंनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

आयआरएस सेवेत रूजू झाल्यापासून हा परवाना माझ्या नावावर आहे. पण परवान्याचे कायदेशीर हक्क माझ्या वडीलांकडे असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. 2006 मध्ये सेवेत रूजू झाल्यापासून या बारचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेत आहे आणि या कमाईचा उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रात असून यात कोणताच गैरव्यवहार नसल्याचं समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

“मी पुन्हा येत आहे, चला काहीतरी तूफानी करूयात”

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

‘आम्हीच कमी पडलो’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली देशाची माफी

मोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More