बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?, नवाब मलिकांचं भाजपला खुलं आव्हान

मुंबई | राज्यात आयकर विभागाच्या धाडसत्राला पुन्हा सुरूवात झाली आहे. यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. अजित पवारांशी संबंधित असलेल्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाने काल धाडी टाकल्या. यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर कडाडून टीका करत खुलं आव्हान दिलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. साताऱ्यातील जरंडेश्र्वर साखर कारखान्यावरही छापा टाकला. हे म्हणताना भाजप ईडी, एनसीबी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना वारंवार बदनाम करत असल्याचा घणाघात नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

या राज्यात आणि जिथे जिथे भाजपचं सरकार आहे त्या सर्व ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्या त्या सरकारला बदनाम करायचं आणि दबाव निर्माण करायचा. बंगालमध्येही ईडीच्या साहाय्याने दबाव आणला आणि भाजपमध्ये सामिल करून घेतलं. महाराष्ट्रातही बरेच नेते भाजपमध्ये गेले त्यांच्यावरही ईडीचा दबाव होता. पण आमच्या तिन्ही पक्षांचे नेते भित्रे नाहीत. ते दबावाला बळी पडणार नाहीत, असंही मलिक म्हणाले.

सोमय्यांवर आरोप करताना मलिक म्हणाले की, ‘हे ज्यांच्यावर आरोप करत होते त्यांनी गंगेत डुबक्या मारल्यावर कुठे गेले आरोप? भ्रष्टाचारमुक्त होणं म्हणजे भाजपमध्ये डुबक्या मारणं का.’ बँका बुडवणारे भाजपचे किती मंत्री, नेते आहेत ते मी भविष्यात पुराव्यानिशी उघड करणार आहे. आता भाजपविरूद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ दे. आम्ही तयार आहोत, असं खुलं आव्हानच नवाब मलिक यांनी दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

सैनिकहो तुमच्यासाठी!; देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

MI vs SRH: प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी मुंबईला खेळावी लागणार अफलातून खेळी

मुंबईकरांनो सावधान! कोरोना रुग्णांची पुन्हा होतीये झपाट्याने वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More