बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हिंमत असेल तर त्यांनी दावा ठोकावा’, नवाब मलिकांचं समीर वानखेडेंना खुलं आव्हान

मुंबई | नवाब मलिकांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपाचं सत्र सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच रोज नवाब मलिक हे पत्रकारांशी संवाद साधत अनेक खुलासे करत आहेत. समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

समीर वानखेडे मुस्लिम आहेत असा दावा करत नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. तसेच मी करत असलेला दावा जर खोटा असेल तर समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी माझ्यावर दावा दाखल करावा, असं थेट आव्हान नवाब मलिकांनी दिल्याने आता हा वाद आणखी चिघळणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

दरम्यान, नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच आता समीर वानखेेडेंबद्दल केलेल्या आरोपांमुळे आणि गौप्यस्फोटामुळे त्यांचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

नवाब मलिकांनी आता थेट खोटं बोलत असेल आणि माहिती खोटी असेल तर माझ्याविरूद्ध दावा करण्याचं आव्हान केल्याने या प्रकरणात आणखी काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. येत्याकाळात याबाबत नवाब मलिक आणखी काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

पेट्रोल महागलं म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं चक्क खरेदी केला घोडा

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More