बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी आपला मुलगा काय करतो ते पहावं”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत सोमय्यांच्या आरोपांचे खंडण करत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

सोमय्यांचे आरोप हे बिनबुडाचे आणि राजकीय स्वार्थाचे आहेत. किरीट सोमय्यांची कोणीही दखल घेत नाही. सोमय्या त्यांचा बडेजाव तयार करत भीती फैलवण्याचं काम करत असतात. सोमय्यांनी दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी तुमचा मुलगा काय करतो, कोणाला फोन करतो. कोणाला खंडणी मागतो हे आधी त्यांनी पहावं. तसेच सोमय्या यांचे नातेवाईक काय करतात आणि त्यांच्या किती बेकायदेशीर कंपन्या आहेत. मनी लाँन्ड्रींग कशा पद्धतीने करतात हे सर्व लोकांना माहित आहे, असं मलिक म्हणाले आहेेेेेेेत.

काही वर्षांपूर्वी आयकर विभागाने हसन मुश्रीफांच्या घरावर छापेमारी केली होती, पण आयकर विभागाला यात हाती काहीच लागलं नाही. आता या प्रकरणाला दोन वर्ष झाली तरी या प्रकरणावर कोणतीही कारवाई झाली नाही, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सोमय्यांनी त्यांच्यावर आधी बोट ठेवलं होतं. राणे कुटुंबियांनी बनावट खोट्या कंपन्या तयार करत मनी लाॅन्ड्रींग केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. मात्र आता सोमय्या नारायण राणे यांच्यावर गप्प का आहेत? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या –

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

पाच जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला होणार मतदान

‘मुश्रीफांच्या आरोपामध्ये बूड असेल तर…’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

सुशांतसिंग राजपूत पुन्हा चर्चेत! ट्विटर अचानक ट्रेंड होतंय ‘CBI CONFIRMS SSR MURDER’

पैसे परत न दिल्यानं भरमंडईत महिलेची छेडछाड; महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More