‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट
मुंबई | आर्यन खान प्रकरणापासून रंगत असलेला अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकविरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर वानखेडेंनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात 1.25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला. या दाव्यासंदर्भात नवाब मलिकांनी आज एक सुचक ट्विट केलं आहे. माझं तोंड बंद केलं तरी माझ्या विचारांना तुम्ही बांधून नाही ठेऊ शकत, या आशयाचं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे.
समीर वानखेडेंच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा केला आहे. याप्रकरणाची सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यापुर्वी नवाब मलिकांना न्यायालयाकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. त्यात नवाब मलिक आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
नवाब मलिकांनी आत्तापर्यंतच्या पत्रकार परिषदेत अनेक आरोप करत खुलास्यांचा सपाटा लावला होता. तसेच नवाब मलिक आज आणखी एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात त्यांनी केलेल्या सुचक ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत मलिक काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ज़बाँ को बंद करें या मुझे असीर करें
मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते !— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 9, 2021
थोडक्यात बातम्या-
“भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय”
“…तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, कारवाई करेल”
SIT चौकशी दरम्यान किरण गोसावी संबंधी धक्कादायक माहिती आली समोर!
मोठी बातमी! दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं
“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”
Comments are closed.