बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच आहे. यातच समीर वानखेडेंवर ट्विटर वार करणारे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. पुन्हा एकदा मलिकांनी वानखेडंवर घणाघात केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक नवं वळण पहायला मिळतंय.

एकापाठोपाठ दोन ट्विट करत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. पहिल्या ट्विटमध्ये मलिकांनी समीर वानखेडेंवर कारवाई करण्याबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्रक शेअर केलं आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटीक्स यांना पाठवणार आहे. ते समीर वानखेडेंच्या चौकशीमध्ये हे समाविष्ठ करतील.

दुसऱ्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं की, ‘SPECIAL 26’ लवकरच याविषयीचा मजकूर मी प्रसिद्ध करेल. मलिकांच्या या दोन ट्विटनं सध्या खळबळ माजवली आहे. त्यामुळे मलिक कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु झाल्यापासून त्यांच्या खासगी आणि वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More