Top News

अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

मुंबई | राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हातात घेतला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर सोपवली आहे.

स्वत: निवडणून येण्याचा विश्वास आणि ताकद नाही म्हणून सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मुंबईत पक्षाची अजिबात वाढ झाली नाही. पण मी पूर्ण ताकदीने पक्षकार्यासाठी वाहून घेईल आणि पक्षाला चांगले दिवस दाखवण्यासाठी काम करेल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

सचिन अहिर यांच्यावर पक्षाने खूप विश्वास ठेवला होता. पण त्यांनी पक्षाशी गद्दारी करत विश्वासघात केला. पण त्यांचं त्यांना लखलाभ…. शिवसेनेच्या तीन जागा आम्ही कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं.

दरम्यान, सचिन अहिर यांचा स्वत:वर विश्वास नव्हता. परंतू शिवसेनेने पडणारा नेता नेला, असा निशाणा त्यांनी अहिरांबरोबर शिवसेनेवर साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

-ब्राह्मणांमध्येच खास गुण असतात; केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा दावा

-…अन् जितेंद्र आव्हाड तोंडावर पडले; ‘ते’ ट्विट केलं डिलीट

-मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या