मनोरंजन

नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच मराठी पदड्यावर!

मुंबई | वेगवेगळ्या धाटणीचे, मात्र खास करून प्रौढांसाठीच्या विषयांवरील सिनेमे करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीला आता कौटुंबिक सिनेमा करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. आगामी ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमाच्या निमित्तानं नवाजुद्दीनने कौटुंबिक सिनेमा करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

नवाजुद्दीन यापूर्वी कधीही रोमँटिक हिरो म्हणून पाहायला मिळालं नाही. म्हणून पहिल्यांदा रोमँटिक भूमिकेत तो प्रेकक्षांसमोर येणार आहे. या सिनेमात रोमान्ससोबतच थोडी कॉमेडीही असल्याची माहीती नवाजुद्दीनने दिली आहे.

माझ्या बहुतेक सिनेमांमध्ये प्रौढांसाठीचे विषय असतात. पण आता माझी मुलगी मोठी झाली आहे. ती माझे सिनेमे बघेल. त्यामुळे कौटुंबिक सिनेमे करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्याची सुरवात या चांगल्या सिनेमाने होत असल्याचंही नवाजुद्दीनने सांगितलं.

ज्या सिनेमांनी फिल्म फेस्टिव्हल्समधेही चांगली कामगिरी केली आहे त्यांना त्या स्क्रिन्स मिळाव्यात. माझ्या सर्वात आवडत्या सिनेमांच्या यादीत सर्वाधिक मराठी सिनेमे आहेत. ‘श्वास’, ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘कोर्ट’ यांसारख्या सिनेमांना थिएटरमध्ये स्क्रीन्स मिळायला हव्यात. व्यावसायिक सिनेमांच्याबाबतीत मी समजू शकतो, कारण त्यांचं बजेटही तेवढं मोठं असतं. पण, अशा पद्धतीच्या सिनेमांना थिएटरमध्ये स्थान मिळायला हवं, असंही नवाजुद्दीन मराठी सिनेमांना थिएटर न मिळण्याबाबत म्हणाला.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या