कारगिलच्या युद्धात शरीफ आणि मुशर्रफ मारले गेले असते!

दिल्ली | भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या कारगील युद्धात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ मारले गेले असते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलंय. 

युद्ध सुरु असताना २४ जून १९९९ रोजी भारताची जग्वार विमानं नियंत्रणरेषेजवळ बॉम्बफेक करत होती. यावेळी त्यांनी गुलतेरी या पाकिस्तानच्या रसदपुरवठा केंद्रावर बॉम्ब फेकला. मात्र हा बॉम्ब दुसरीकडे पडला.

दरम्यान, याचवेळी शरीफ आणि मुशर्रफ याठिकाणी उपस्थित होते. बॉम्ब निशाण्यावर पडला असता तर दोघेही मारले गेले असे असा दावा भारतीय कागदपत्रांमध्ये करण्यात आलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या