“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य

Nawazuddin Siddiqui | ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘बजरंगी भाईजन’, ‘किक’, मांझी’, ‘रईस’, या चित्रपटांद्वारे प्रसिद्धीस आलेला बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी त्याच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखला जातो. यासोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो.

नवाजची पत्नी आलियाने त्याच्यावर बरेच आरोप केले होते. दोघे लवकरच वेगळे होणार, अशा चर्चा यामुळे रंगल्या होत्या. पण, त्यांनी भांडणं सोडवून पुन्हा एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. अशात त्याने एका मुलाखतीमध्ये रिलेशनशिपबाबत मोठं भाष्य केलंय.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा खुलासा

या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल आणि नात्यातील फसवणुकीबद्दल आपलं मत मांडलं. “माझ्यासोबत काही लोक धूम्रपान करत होते, म्हणून मी देखील केले. मला त्याचा प्रचार करायचा नाही. ही माझी चूक होती आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे”, असं नवाजुद्दीन म्हणाला.

पुढे त्याने लग्नाबाबत भाष्य केलं. “जर तुम्ही एकमेकांशी लग्न केलं नाही, तर तुमचं एकमेकांवर अधिक प्रेम असतं. पण, लग्न केलं तर ते प्रेम कमी होऊ लागते. त्यानंतर तुम्हाला मुलंबाळं झाली की बऱ्याच गोष्टी घडतात. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि पुढेही त्याच्यावर प्रेम करत राहण्याची इच्छा असेल तर लग्न करू नका.”, असं गजब सल्ला यावेळी नवाजुद्दीनने (Nawazuddin Siddiqui ) दिला आहे.

“..तर व्यक्तीने लग्नच करू नये”

“समाजात म्हटलं जातं की, व्यक्तीने वयाच्या विशीमध्ये लग्न केलं पाहिजे. त्यानंतर आपण आनंदी राहू शकतो. आपल्याला असं वाटतं की आपलं प्रेम, पत्नी आपल्याला आनंद देईल. परंतु काही काळानंतर फक्त तुमचं कामच तुम्हाला आनंद देऊ शकतो.”, असंही नवाजुद्दीन म्हणाला.

तसंच पुढे तो म्हणाला की, “जर तुम्ही प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही आनंदी राहू शकता. लग्नानंतर लोक एकमेकांना गृहीत धरु लागतात. माझं-तुझं अशा गोष्टी घडायला लागतात. जर तुमचे लग्न झाले नसेल आणि तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता. कुठेतरी ते लग्नानंतर संपुष्टात येऊ लागते”, नवाजुद्दीनचं (Nawazuddin Siddiqui ) हे वक्तव्य आता चर्चेत आलंय.

News Title –  Nawazuddin Siddiqui statement on relationship

महत्त्वाच्या बातम्या

“अजित पवारांचे 22 आमदार संपर्कात”; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता?

बैल खरेदीच्या वादातून झाला गोळीबार, पुढे घडलं भयंकर?

बीड कथित ऑडिओ प्रकरणी ‘या’ दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल

चांदीचे मंदिर, सोन्याच्या मूर्ती! अनंत व राधिकाची लग्नपत्रिका एकदा पाहाच