गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अग्नीतांडव माजवलं आहे. एटापल्ली तालूक्यातील वट्टेपल्ली-गट्टेपल्ली मार्गावर रस्ते काम करण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी आग लावली. त्यात 17 वाहने जळून खाक झाली आहेत.
रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याने ही वाहने तेथे उभी होती. यात 10 जेसीबी, 5 ट्रक्टर ,2 जीप जळून कोळसा झाल्या आहेत.
नक्षलवाद्यांनी रात्री काम करणाऱ्या मजुरांना काम थांबवण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी वाहनांना आग लाऊन दिली व तेथून पळ काढला.
दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अरबाजपासून वेगळ्या झालेल्या मलायकाचा मोठा निर्णय; खान आडनाव हटवलं!
-कांद्याला बाजार नाही!; कांद्याचे पैसे मोदींना मनीऑर्डर करुन शेतकऱ्याचा निषेध
-मराठा समाजाची आनंदाची बातमी; आजपासून मराठा आरक्षण लागू
-मराठा आरक्षणाचा पाया आम्हीच रचला- भास्कर जाधव
-आता आम्हालाही आरक्षण द्या; ब्राह्मण समाजाची मागणी
Comments are closed.