नवी दिल्ली | अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. सुकमा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना मदत केल्याच्या रागातून ही धमकी देण्यात आलीय.
पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीने यासंदर्भात एक पत्रक काढलंय. पत्रकामध्ये शहिदांच्या कुटुंबियांना मदत करु नका, असं सांगण्यात आलंय. तसेच अक्षय कुमार आणि सायना नेहवालचा निषेध करण्यात आलाय.
Comments are closed.