नयना पुजारीच्या मारेकऱ्यांवर आरोप सिद्ध, आज शिक्षेची सुनावणी

नयना पुजारी

पुणे | सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हत्याकांड प्रकरणातील आरोपींवर खून, बलात्कार, अपहरण आणि चोरीचे गुन्हे सिद्ध झालेत. आज शिवाजीनगर सत्र न्यायालयात याप्रकरणी शिक्षेची सुनावणी होणार आहे. 

काल योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही आरोपींना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. मात्र माफीचा साक्षीदार राजेश चौधरीला हजर न केल्याने कामकाज सुरु होण्यास उशीर झाला. न्यायालयानं पोलिसांच्या या ढिसाळपणावर ताशेरे ओढले. 

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा