बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

मुंबई | राज्यातील राजकारण सध्या ड्रग्ज आणि बाॅलिवूड यांच्याभोवती फिरत आहे. 2 ऑक्टोबरला एनसीबीने एका क्रूझवरून बाॅलीवूड कलाकार शाहरूख खान याच्या मुलाला ताब्यात घेतलं. आर्यन खानच्या अटकेने राज्यासह देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. आर्यन खान प्रकरणात आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

आर्यन खानच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानकडून निष्णात वकील अमित देसाई यांनी बाजू मांडली आहे. आर्यन खानकडं कसल्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नाही. तरी एनसीबीची आर्यन खानवरची कारवाई हास्यास्पद असल्याचं अमित देसाई यांनी म्हटलं आहे. ज्याच्याकडं काहीच सापडल नाही, जो त्या क्रुझवर देखील उपस्थित नव्हता. त्या मुलावर ड्रग्ज तस्करीचं आरोप करणं हास्यास्पद असल्याचं देसाई न्यायालयात म्हणाले आहेत.

ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद करताना अनेक दावे आणि खुलासे केले आहेत. परिणामी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एनसीबीच्या कारवाईवर अमित खरे यांनी ताशेरे ओढण्याचं काम केलं आहे. अरबाज मर्चंट यानंही आर्यनकडं काहीच सापडलं नाही, असं एनसीबीच्या चौकशीत म्हटलं आहे. ही गोष्ट अमित देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

दरम्यान, आर्यन खानकडून न्यायालयात अगोदर प्रसिद्ध वकील सचिन मानेशिंदे बाजू मांडत होते. तर आज अमित देसाई यांनी बाजू मांडली आहे. आर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या 

पतीला दुहेरी जन्मठेप, पत्नीची हत्या कशी केली वाचाल तर काळजाचा थरकाप उडेल!

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

…तर 30 आमदारांचे तिकीट कापणार; भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा इशारा

“कुणीही येईल आणि तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल”

सचिनच्या लेकीचा फोटो, अभिनेत्याचा एक लाईक अन् नव्या चर्चांना उधाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More