बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबीची धडक कारवाई; अजून एका ड्रग पेडलरला घेतलं ताब्यात

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज केसनंतर एनसीबीने आपली कारवाई अधिक मजबुत केली आहे. मन्नतवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने काल रात्री एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं आहे. ड्रग प्रकरणातील चॅटमधून या पेडरलचं नाव समोर आलं आहे.

एनसीबीने काल मध्यरात्री 24 वर्षीय ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं आहे. तो या प्रकरणात मुख्य संशयित असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. मात्र त्या पेडलरचं नाव एनसीबीने अजून उघड केलं नाही. ड्रगसंबधातील चॅट बाहेर आल्यानंतर या ड्रग पेडलरचं नाव समोर आलं होतं.

काल एनसीबीने आर्यन खानची मैत्रीण अनन्या पांडे हीच्या घराचीही झडती घेतली होती. त्यानंतर अनन्य पांडेला आता एनसीबीने आज 11 वाजता चौकशीला हजर राहावं लागणार आहे. अनन्या पांडे हीचंही नाव व्हॅाट्सअॅप चॅट मधून समोर आलं असल्याची चर्चा आहे. अनन्यासह इतरही दोन जणांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं.

दरम्यान, एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला होता. काल एनसीबीने तीची 2 तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यातच काल एनसीबीने कालचं एका ड्रग पेडलरला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कोणतं नवं वळण लागतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा”

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More