बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले होते. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी त्यांची सकाळपासून चौकशी सुरु होती. दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समीर खान यांना अटक केली आहे.

ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता.

सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता ‘या’ विभागाची सांभाळणार जबाबदारी

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना अमोल कोल्हेंनी सुनावलं, म्हणाले…

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More