महाराष्ट्र मुंबई

ड्रग प्रकरणी एनसीबीने ‘या’ अभिनेत्रीला केली अटक!

मुंबई | एनसीबीने महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली. सध्या एनसीबीकडून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. त्याचवेळी दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता कुमारी हिला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.

श्वेताला मुंबईजवळील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. एनसीबीने मुंबईच्या क्राउन बिझनेस हॉटेलवर छापा मारला. तेथून 400 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलंय.

अटक अभिनेत्रीविरोधात एनडीपीएस अ‌ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक ड्रग तस्करांनाही अटक करण्यात आली आहे, असं एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितलं.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडच्या ड्रग संबंधांप्रकरणी एनसीबीकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला दररोज मिळणार ‘इतके’ रुपये; आसाम सरकारने घेतला मोठा निर्णय

2 वर्षाखालील बालकांवर कोरोना लसीची चाचणीची तयारी सुरु!

बापमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला पाहण्यासाठी 83 वर्षाचे टाटा मुंबईहून पुण्याला

गायिका आशा भोसलेंचं Insta account झालं हॅक!

‘सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत’; शेतकऱ्यानं पंचायत कार्यालयात केली आत्महत्या

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या