Top News मनोरंजन

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात

मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बॅालिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्यांमधील काही कलाकारांची देखील एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अशातच दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.

ऋषिकेश पवार हा सुशांतला ड्रग्ज पुरवत असल्याच्या आरोपावरुन त्याला काही दिवसांपासुन एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र अनेकवेळा नोटीस पाठवून देखील ऋषिकेश चौकशीसाठी गेला नव्हता. त्यामुळे एनसीबीचे पथक  ऋषिकेशच्या चेंबूरच्या घरी गेले होते. मात्र ऋषिकेश घरी नसल्यामुळे एनसीबीने त्याला फरार म्हणुन घोषीत केलं होतं.

आज पोलिसांनी ऋषिकेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एनसीबीनं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला आहे.

पोलिसांनी ऋषिकेशला ताब्यात घेतलं असुन, सुशांतचा ड्रग्जशी नेमका काय संबंध होता या माहितीसाठी एनसीबीकडुन ऋषिकेशची चौकशी केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत; क्रेनद्वारे घातला फुलांचा हार

कोरोनानंतर पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार- आदित्य ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या