बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरूख खान लेकाच्या भेटीला तर ‘मन्नत’वर एनसीबीचा छापा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने केलेल्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. काल आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला. त्यानंतर आज शाहरुख खान आपल्या मुलाला भेटायला आर्थर रोडवर गेला होता. त्यानंतर एक वेगळंच नाट्य पहायला मिळालं.

आज सकाळी 9 वाजता शाहरूख खान आपल्या गाडीतून आर्थर रोड तुरूंगाबाहेर पोहचला होता. यावेळी त्याची पत्नी आणि मुलगी शाहरूखसोबत आली नाही. शाहरूख आणि त्याचे बाॅडीगार्ड सकाळी तुरूंगाबाहेर आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून शाहरूख आर्यनला भेटण्यास गेला. तब्बल 15 मिनिटं बाप लेकाच्यात भेट झाली. त्यानंतर शाहरूखच्या मन्नत बंगल्यावर वेगळीच घडामोड घडली.

एनसीबीने आज मुंबईतील वांद्रे आणि अंधेरीत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी एनसीबीचं एक पथक शाहरूखच्या मन्नतवर देखील धडकलं. दुपारी 1च्या सुमारास एनसीबीचे अधिकारी शाहरूखच्या बंगल्यावर दाखल झाले. त्यावेळी शाहरूख बंगल्यावर नव्हता अशी माहिती समोर आली आहे. त्यावेळी शाहरूखची मॅनेजर पूजाने एनसीबीच्या कारवाईला सहकार्य केलं. छाप्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनचे सर्व इलेक्ट्राॅनिक डिवाईसची पडताळणी केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एनसीबीने तिच्याकडे आर्यन खानशी संबंधित काही कागदपत्र सोपवली. त्याचवेळी आर्यन खानची मैत्रीण अनन्या पांडेच्या घरावर देखील छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणात आता कोणतं नवं वळण लागतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More