Top News महाराष्ट्र मुंबई

ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

मुंबई | मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजानी आणि राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 200 किलो ड्रग्स पकडण्यात आलं होतं. याच प्रकरणासंबधात एनसीबीनं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावाई समिर खान यांना समन्स पाठवलं आहे.

200 किलो ड्रग्स प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यामधील मुख्य आरोपी करण संजानी आणि समिर यांच्यात दोघांमध्ये गुगल पे वरून  20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता.

त्यामुळं एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग खरेदी-विक्री झाल्याचा संशय असल्यामुळं एनसीबीनं समिर खानला चौकशीसाठी बोलावलं आहे. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे?, याची चौकशी एनसीबी करणार आहे

दरम्यान, नुकताच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचं प्रकरण ताजं असतानाच राष्ट्रवादीला हा दुसरा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य म्हणाले…

पुणे जिल्ह्यासाठी ‘इतक्या’ कोरोना लसीच्या डोसची गरज- डाॅ. राजेश देशमुख

“हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरुच राहील”

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांणा उधाण!

“ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार?, पण मी मरेपर्यंत लढेन”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या