शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावूक, म्हणाले…

NCP 25 Anniversary । आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन (NCP 25 Anniversary) साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांचं नाव घेत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अनेकांनी मेहनत घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांचं देखील नाव घेतलं होतं. (NCP 25 Anniversary)

शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावूक

शरद पवार यांनी पक्षवाढीसाठी 24 वर्षे मेहनत घेतली असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी स्थापन करण्यात आली तेव्हा अनेकांनी खूप कष्ट घेतले. भुजबळसाहेब तर पाहायला भिंगरी लावून पळत होते. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आज 25 वर्षे पूर्ण होत असताना काही लोकं आपल्याबरोबर नाहीत, याची मला खंत आहे. आर.आर.आबा, बेंडके सर अशा अनेकांचं महत्त्वाचं योगदान आहे. गेली 24 वर्षे साहेबांनी पक्षाचे नेतृत्व केलं. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं म्हणताना अजित पवार भावूक झाले आहेत. (NCP 25 Anniversary)

जुलै अखेरीस आपले राज्यसभेत तीन खासदार असतील. तसेच लोकसभेत सुनील तटकरे खासदार असतील. लोकसभा निवडणुकीत आपल्याला फारसं यश मिळालं नाही. पण आपण जोमाने लढू. मी अर्थसंकल्प सादर करेपर्यंत चार दिवस अर्थसंकल्पासाठी आणि चार दिवस देईन, असं अजित पवार म्हणाले. (NCP 25 Anniversary)

तसेच अजितदादांनी संविधानावर भाष्य केलं आहे. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणी माईका लाल बदलू शकणार नाही. तर विरोधकांचा नरेटिव्ह सेट झाला आहे. त्यांना मिळालेली मतं आणि आपल्याला मिळालेली मतं यांमध्ये केवळ 1/2 टक्क्याचा फरक आहे.

नितीशकुमार आणि चंद्रबाबूंवर केलं भाष्य

तसेच त्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, दिल्लीत काहींवर कारवाई केली मात्र सातही जागा भाजपच्या आल्या. कारवाई केल्यामुळे लोकं नाकारत नाहीत, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच दुसरीकडे त्यांनी नितीशकुमार आणि चंद्रबाबूंबद्दलही भाष्य केलं आहे.

चंद्रबाबू आणि नितीशजींच्या राज्यात दलित आणि मुस्लिम यांच्याकडे राहिल्याने त्यांचा विजय झाल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. आपल्यापासून दूर झालेल्यांना पुन्हा आपल्याकडे जोडून आणायचं आहे, असं वक्तव्य अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – NCP 25 Anniversary Ajit Pawar Got Emotional During His Speech

महत्त्वाच्या बातम्या

“…तर शिवसेना एकत्र येईल”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन!

दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर

पुणेकरांनो सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबईत मान्सूनचं जोरदार आगमन, ‘या’ भागांना येलो अलर्ट