पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा जितका महत्त्वाचा तितकाच वादग्रस्त देखील ठरत आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरूषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला होता. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्यानं वाद वाढला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये फडणवीस आले असताना त्यांच्या ताफ्यातील ते ज्या गाडीत बसले होते त्यादिशेन एका कार्यकर्त्यानं चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. फडणवीसांचा ताफा आल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं सर्व गोंधळ उडाला होता. परिणामी हा प्रकर घडला आहे.
देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते तिथ असल्यानं नेमकी चप्प कुणी फेकली तेही समोर आलं नाही. गोंधळ निर्माण होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी व्यासपिठावर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या –
“ईडीला राज्यात शेतकऱ्यांच्या बिडीऐवढी पण किंमत राहिली नाही”
बिगुल वाजलं! आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी होणार?
“कोणाला सांगताय म्हातारा झालोय, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही”
“पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान”
मोठी बातमी! एसटी महामंडळातील नोकरभरती बंद
Comments are closed.