मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या संघटनेत काम करणाऱ्या दोन नेत्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचं नक्की केल्याचं कळतंय. आदिती नलावडे आणि शिवाजीराव गर्जे ही ती दोन नावं असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर राहिलेल्या राहुल नार्वेकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेकडून विधानसभा लढवली तर राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
विधानपरिषदेवर आमदारकी मिळणार असलेल्या आदिती नलावडे या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई संघटक आहेत. तसेच त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलची जबाबदारी आहे. पडत्या काळात त्यांनी पक्षाला साथ दिल्याने त्यांना ही संधी मिळणार असल्याचं कळतंय.
दरम्यान, शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी संघटनेत दीर्घकाळ प्रामाणिकपणे काम केल्यानं त्यांना ही संधी मिळणार असल्याचं कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता पुढील पाच वर्ष कोणत्याही टोकाची लाचारी पत्करण्यास उद्धव ठाकरे तयार”- https://t.co/RIrjo4Qjk2 @NiteshNRane @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) December 19, 2019
नागरिकत्व काद्याविरोधात संपूर्ण देश आक्रमक; अमित शहांनी बोलावली बैठक – https://t.co/UCJw96acq9 @AmitShah #NRC_CAA
— थोडक्यात (@thodkyaat) December 19, 2019
“महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असं वाटत असेल तर भाजप मूर्ख आहे”- https://t.co/GjKhJ7S5fs @Awhadspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 19, 2019
Comments are closed.