NCP Ajit Pawar | महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाने 38 उमेदवार घोषित केले होते.आता अजित पवार गटाचे एकूण 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (NCP Ajit Pawar )
अजित पवार गटाची दुसरी यादी
1. इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
2. तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
3. अणुशक्तीनगर – सना मलिक
4. वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
5. वडगाव शेरी – सुनील टिंगरे
6. शिरुर- ज्ञानेश्वर कटके
7. लोहा – प्रताप चिखलीकर (NCP Ajit Pawar )
दरम्यान, अजित पवार गटात नुकताच भाजपचे नेते तथा सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी पक्षप्रवेश केलाय. यानंतर त्यांना थेट विधानसभेचं तिकीट मिळालं आहे. कवठे महांकाळमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात थेट लढत होईल. (NCP Ajit Pawar )
News Title : NCP Ajit Pawar Group second Candidate List
महत्वाच्या बातम्या-
मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?, मोठी माहिती समोर
कॉँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, 48 नावांची झाली घोषणा!
आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार अत्यंत शुभ; मिळणार पद, पैसा आणि प्रतिष्ठा
मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर