साताऱ्यानंतर सोलापूरातही काँग्रेस-राष्ट्रवादी धक्का बसणार???

सोलापूर | पश्चिम महाराष्ट्र आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र गेल्या विधानसभा आणि झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने याच गडाला सुरूंग लावला.

आज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजेंनी पवारांची साथ सोडली त्यात सोलापूरचे काही काँग्रेस नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय.

सुशीलकुमार शिंदेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सोलापूरच्या अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्यासोबत सोलापूर काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारी भाजपत प्रवेश करण्याचीही शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी पवारांना झटका देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने माढ्याची जागा गमावली. अन् तिथेच राष्ट्रवादीच्या गडाला सुरूंग लागला.

दरम्यान, दुसरीकडे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केल्याने  आघाडीच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा सेना-भाजपने चंग बांधलाय.

महत्वाच्या बातम्या-

सरपंचांसह उपसरपंचांना ‘अच्छे दिन’; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आरक्षण नाही मात्र धनगर समाजासाठी सरकारची मोठी घोषणा!

वेल्हाचं नाव ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

‘अब होगा न्याय!’ ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर