Loading...

आघाडीमध्ये जागावाटपावरून मतभेद; काँग्रेसला ‘हा’ तर राष्ट्रवादीला हवा ‘हा’ फॉर्म्युला!

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतमतांतरं असल्याचं समजतंय.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्याने विधानसभेला 50-50 टक्के जागावाटप व्हावं, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आधारित जागावाटप व्हावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Loading...

2014च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्यात, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी चर्चेअंती मार्ग काढू आणि विधानसभेला मोठ्या शक्तीनिशी सामोरं जाऊ, असं म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-माजी पंतप्रधानांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

-वादग्रस्त धार्मिक पोस्ट करणं तरूणीला पडलं महागात; कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

-“अमेरिका आवडत नसेल तर देश सोडून जा”

Loading...

-शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मंत्री, आमदारांप्रमाणे सरपंच देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेणार

Loading...