राष्ट्रवादीसोबत ‘मनसे’ नातं जुळणार का?, एकीकडे राष्ट्रवादीची तर दुसरीकडे मनसेची बैठक!

मुंबई |  कालच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आज लगेचच मनसेने ‘राजगड’ या पक्ष कार्यालयात एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे.

राष्ट्रवादीसोबत मनसेचं ‘नवं नातं’ जुळणार का?, यावर राज ठाकरे आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात आपली लोकसभेची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन केलंय.

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मनसे’च्या आघाडीतल्या प्रवेशावर निर्णय होण्याचं अपेक्षित आहे. त्यानंतर लगोलग राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील.

आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी महाराष्ट्राला नवं नातं पाहायला मिळणार का?, हेच पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?

-महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं…

आज राष्ट्रवादी आपले सगळे पत्ते उघडे करणार?, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

राहुल गांधीनी साधलं ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य! म्हणतात… नफरत से नही प्यार से जीतेंगे

‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारचं तत्वज्ञान, सोनिया गांधींचा बोचरा वार

Google+ Linkedin