राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर, ‘या’ नेत्यांना दिली संधी
मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापलेलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले नव्हते. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे दोघेही उमेदवारी अर्ज भरतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची संधी मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे आभार मानले आहेत. विधानसभेच्या कालखंडामध्ये ज्या घटना घडल्या त्यामुळे मला भाजपतून राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं. भाजपने मला फक्त गाजर दाखवलं. मात्र ज्याप्रकारे मला राष्ट्रवादीने आधार दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारच्या शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड, उमा खापरे यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली.
थोडक्यात बातम्या-
“पडद्यामागून कोणीतरी मुंडे, महाजन ही नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतोय”
कोरोनाने टेन्शन वाढलं; गेल्या 24 तासातील रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर
‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळ-वाऱ्यासह जोराचा पाऊस; हवामान खात्याचा मोठा अंदाज
“राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मुख्यमंत्रीपद सांभाळणं सोपं नाही”
‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’; विनायक मेटे संतापले
Comments are closed.