नाशिक | अजित पवार यांनी महाजनांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून भाजपने ‘मुतऱ्या तोंडाचा अजित….’ अशा आशयाचे बॅनर्स नाशिकमध्ये लावले होते. त्या बॅनरचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं आहे.
भाजपवाल्यांनो सत्तेचा माज करू नका… आम्ही तुमच्यासारखे असभ्य नाही… पातळी सोडाल तर आम्ही आमचा हिसका दाखवू आणि घरात घुसून उत्तर देऊ, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीने दिला.
भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणारे बॅनर्स राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावले होते. यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपने लावलेला बॅनर जाळला.
दरम्यान, अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना ‘नाच्या’ असं संबोधलं होतं. यावरून राष्ट्रवादी विरूद्ध भाजप यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय.
महत्वाच्या बातम्या-
-‘मुतऱ्या तोंडाचा अजित…’; गिरीश महाजन-अजित पवार यांच्यात जुंपली!
–…अन् छत्रपती संभाजीराजे निघाले पूरग्रस्तांना मदतीला!
-“महाजन पळवा-पळवी करतील की राज्यातील पूरस्थितीची पाहणी”
-मला कोणालाही सिद्ध करुन दाखवायची गरज वाटत नाही; विराटने टीकाकारांना सुनावलं
-…म्हणून पूरग्रस्त कोल्हापूरात जाणं टाळलं- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.