बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रविण दरेकरांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून ‘प्रविणा मावशी’ नावाची उपमा

ठाणे | प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलताना भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा जीभ घसरली होती. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आक्रमक होत दरेकरांनी महिलांची माफी मागावी, असं म्हणून राज्यभर आंदोलनं सुरू केली आहेत. रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज गुरूवारी भिवंडीत दरेकर यांच्या फोटो बॅनरला जोडे मारो आंदोलन केलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

प्रविण दरेकर यांचे स्त्री वेशातील बॅनर लावून ‘प्रविणा मावशी’ असा उल्लेख करत दरेकरांची खिल्ली उडवण्यात आली आहे. दरेकरांच्या बॅनरवरील फोटोला लिपस्टिक लावून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्यानंतर बॅनर जाळत दरेकरांचा निषेध देखील करण्यात आला.

दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. दरेकर सारख्या नेत्यांचा भाजपला काहीच उपयोग नाही, असं सुरेखा पुणेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

…अन् नो बाॅलवर माझी विकेट पडली – संजय राठोड

मोठी बातमी! विराट कोहली सोडणार भारतीय संघाचं कर्णधारपद

…म्हणून गडकरींनी आपल्या सासऱ्यांच्याच घरावर चालवला बुलडोझर; कार्यक्रमात सांगितला ‘तो’ खास किस्सा

‘भाजपमध्ये दरेकरांसारख्या नेत्यांचा….’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच सुरेखा पुणेकर कडाडल्या!

महाविकास आघाडी सरकार पडणार? चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More