“हिंमत असेल तर तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मते मागा; मग पाहा निकाल काय लागतो”

मुंबई |  हिंमत असेल तर तुम्ही गोळवलकरांच्या नावाने मते मागा… आम्ही गांधीजींच्या नावाने मागतो. मग निकाल पाहा काय लागतो, असं आव्हान राष्ट्रवादीने भाजपला दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट करत भाजपला आव्हान दिलं आहे.

भाजपात धनशक्तीचा वापर मोठया प्रमाणावर होतो. ही मगरूरी भाजपात वरपासून खालपर्यंत आहे. तुम्ही गोळवलकर गुरुजींच्या शाळेत शिकला आहात. आम्ही महात्मा गांधींचे शिष्य आहोत, असंही राष्ट्रवादीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या ट्वीटला भाजप काय उत्तर देणार याकडे आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-राफेल घोटाळ्याची सखोल चौकशी करून मी सत्य समोर आणणारच- शरद पवार

-वर्ल्ड कप 2019 साठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूंच्या नावांचा समावेश

अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साद; ‘तुमच्या सोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार’

-भाजपचे लोकं माझा दाभोलकर करतील; पण मी मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

-“हेलिकाॅप्टरने फिरण्याइतका पैसा प्रकाश आंबेडकरांना मिळतो कुठून?”