पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातल्या नळ स्टॉप चौकाचं नाव बदलून नळ खड्डे चौक असं केलं आहे. राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाचा निषेध करत राष्ट्रवादीने हे अनोखं आंदोलन केलं. नळ स्टॉप चौकात रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. त्यात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला नळस्टॉप चौकात अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागतो. कोथरूडकरांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून राष्ट्रवादीने आज अनोखं आंदोलन छेडलं.
पुण्यात मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. वाहतूक मंदावली आहे व खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक शारिरिक आजारांना सामोरं जावं लागत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाची पुण्यात एकच चर्चा रंगली होती.
महत्वाच्या बातम्या-
-“सांगली- कोल्हापूरात अत्यंत गंभीर L3 दर्जाची आपत्ती घोषित करा”
-‘शाहू’नगरीतला मुस्लिम समाज बकरी न कापता देणार पूरग्रस्तांना आर्थिक मदत!
-“जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती, म्हणून मी पूरग्रस्त भागात गेलो नाही”
-कोण काय करतो आम्हाला माहित नाही…. आमची लोकं काम करतात- उद्धव ठाकरे
-“राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही”
Comments are closed.