बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडावी, मग आम्ही…”

सातारा | महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या जडणघडीत मोठा वाटा आहे. मात्र ते मराठा आरक्षणासंदर्भात काहीच बोलत नसल्याचं मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडायला हवी. जेणेकरून मराठा समाजाला आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करता येणार असल्याचं पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2 नोव्हेंबरला सातारा येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये मराठा आरक्षणाची पुढची दिशा काय असावी?, हे ठरणार आहे. त्यामुळे याआधी पवारांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगावी.

दरम्यान, सुरेश पाटलांच्या विनंतीवर शरद पवार आपली भूमिका कशा प्रकारे मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले”

आम्ही या गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

…तर लोक मोदींना हाकलून लावतील- राहुल गांधी

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय- शरद पवार

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More